Submitted by शर्मिला. on 31 August, 2025 - 00:21
शशक - 2 – मास्टरस्ट्रोक - शर्मिला र.
" मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”
छप्पन ते चौपन्न इंच असा उर धापापत होता. मायबोलीवरचं प्रसिद्ध वाक्य त्यांनी टाकलं. एवढंच मराठी त्यांना येत होतं. आणि समोरच्याला तेवढंही येत नाही ही खात्री होती त्यांना, म्हणून एवढं तरी बोलायची हिंमत झाली होती त्यांची. आजूबाजूला मराठी येणारं कुणीच नव्हतं. महाराष्ट्रातही मराठी बोलणारे फारसे राहिले नव्हते, तर इथे कुठून येणार? पण त्यांनी हिम्मत केली दाखवणे महत्वाचे.
पण समोरचा एआय च्या माध्यमातून ऐकत असेल तर? त्यांना दरदरून घाम फुटला. रुमाल काढायला हात लांबवला तर जवळचं तांब्या भांड ढणकन पडून त्यांना जाग आली.
घाम पुसत त्यांनी चेहरा चकचकीत केला.
अन् ते मास्टरस्ट्रोक मौनात गेले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सही...
सही...
आवडली
आवडली
हाहा
पूर्ण नाही समजली..
56 इंच आणि मास्टर स्ट्रोक वरून कोण आहे याचा अंदाज आला.. पण नीट संदर्भ नाही समजला.
राजकारण आपली एक्सपर्टीज नाही.. नंतर कोणी जरा उलगडले तर बरे..
(No subject)
ज्जे बात
ज्जे बात
यह लगा मास्टर स्ट्रोक
पूर्ण नाही समजली..>>> आले का
पूर्ण नाही समजली..>>> आले का संत्रे सोलणे .
मित्र आहे असं वाटत असतानाच ट्रम्प एवढे टेरिफ लावेल अस वाटत नव्हतं. उघडपणे एकदाही निषेध केलेला नाही ह्याचा.
शर्मिला धन्यवाद .. लागला
शर्मिला धन्यवाद .. लागला संदर्भ .. ते माझे अज्ञान ..
आता पुन्हा वाचायला मजा आली
आवडली.
आवडली.
हाहाहा
हाहाहा
(No subject)
एकदम भारी
एकदम भारी
भारी!