Maayboli ganeshothsav 2025

शशक २ - फॅमिली व्लॉग - मॅगी

Submitted by मॅगी on 29 August, 2025 - 07:51

"करण, ब्लॅक टीशर्ट, म्हणजे पोट दिसणार नाही आणि जरा फास्ट!" करण ट्रेडमिलवर जोरात पळू लागला. तिने स्वतःच्या मॉडर्न, सेक्सी मॉम लूकवर शेवटचा हात फिरवून पुन्हा रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आज व्ह्यूज वाढायलाच हवेत.

तिने घरभर फिरून चकाचक फर्निचर, नवीन घेतलेल्या/जाहिरात करायच्या वस्तू दाखवल्या. मांजर पायात घोटाळल्यावर मनात आलेली शिवी दाबून तिला कॅमेरासमोर कुरवाळले.

"अरे, टीयांश?" ती खोलीत शिरली. "बघा हा आमचा गोडुला नेहमीप्रमाणे पबजी खेळतोय" ती कॅमेरात बघत खोटं गोड हसली.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Maayboli ganeshothsav 2025