शशक - १ - संगीत - निकु
Submitted by निकु on 27 August, 2025 - 10:56
शहराच्या गजबजाटापासून दूर ती तिच्या गावी आली होती. संध्याकाळी नदी किनारी फिरायला जायचे हा तिचा नित्यक्रम होता. शांत वाहते पाणी, सुदूर पसरलेली हिरवीगार शेती, झाडे, त्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट तिच्या मनाला नेहमीच आनंद देई. शहरी गर्दीचा ताण कमी करायला, रेफ्रेश व्हायला गावची वारी नेहमीच असे. फिरताना ती सुरावट तीच्या कानावर पडली. एक माणूस नदीकिनारी त्या सुरांत तल्लीन झाला होता. मंत्रमुग्ध होत ती आपोआपच त्याच्या जवळ पोहोचली. आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले. ती सुरावट, ते वाद्य आणि तो चेहरा ! संगीतही फसवे असते तर ! तीने मनाशीच नोंद घेतली.
विषय:
शब्दखुणा: