शशक - १ - संगीत - निकु

Submitted by निकु on 27 August, 2025 - 10:56

शहराच्या गजबजाटापासून दूर ती तिच्या गावी आली होती. संध्याकाळी नदी किनारी फिरायला जायचे हा तिचा नित्यक्रम होता. शांत वाहते पाणी, सुदूर पसरलेली हिरवीगार शेती, झाडे, त्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट तिच्या मनाला नेहमीच आनंद देई. शहरी गर्दीचा ताण कमी करायला, रेफ्रेश व्हायला गावची वारी नेहमीच असे. फिरताना ती सुरावट तीच्या कानावर पडली. एक माणूस नदीकिनारी त्या सुरांत तल्लीन झाला होता. मंत्रमुग्ध होत ती आपोआपच त्याच्या जवळ पोहोचली. आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले. ती सुरावट, ते वाद्य आणि तो चेहरा ! संगीतही फसवे असते तर ! तीने मनाशीच नोंद घेतली. "मी तुझीच वाट पहात होतो!" विचकट हसत तो म्हणाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा वाटले कृष्ण होता का तो... पण तो तर विचकट हसला. कृष्णाचे तर मोहक होते.

मग दुसरा अंदाज असा की तिला आधी वाटले कोणीतरी खरोखर गातोय आणि जवळ जाऊन पाहिले तर कोणीतरी मोबाईलवरती गाणे लावले होते म्हणून ती फसली.

तिसरा अंदाज डरचा शाहरुख खान तर आला नव्हता तू है मेरी किरण गात... म्हणजे गाणे छान गात होता हिरोसारखे पण जवळ जाऊन पाहिले तर व्हीलन निघाला

इथेही आता कोणातरी संत्रे सोलावे या प्रतीक्षेत मी Happy

मला पण काव्यात्म होण्यापूर्वीचा, व्हाईटवॉश देण्यापूर्वीचा, कृष्णकृत्ये करणारा आणि १६ सहस्त्र नारीतील एक असं विदारक काही डोळ्यापुढे आलं. कदाचित तुमचा दुसरा लेख आत्ताच वाचला म्हणून असेल. Lol

कदाचित तुमचा दुसरा लेख आत्ताच वाचला म्हणून असेल. Lol >> Lol

तिकडचा लेख वाचल्याचे कळवल्या बद्दल धन्यवाद Happy

धन्यवाद ऋ. , अमितव आणि रानभुली!

छान आहे.

कथा मानवी मनाचं प्रतिबिंब आहे वाटते आहे. आपलं मन वरवर सुंदर आणि सुखावह गोष्टींकडे पटकन खेचले जातं पण तितकच ते फसवं, उथळ किंवा विभद्र असतं असे काहितरी?

चांगली आहे.
सगळेच गोग्गोड असताना मिठाचा खडा असावा तसे झाले.छान ट्विस्ट.

धन्यवाद झंपी, देवीका, छन्दिफन्दि देवकी, कुमारजी आणि शर्मिला!
खावह गोष्टींकडे पटकन खेचले जातं पण तितकच ते फसवं, उथळ किंवा विभद्र असतं असे काहितरी? >> वा! किती सुंदर कल्पना ! इथे लागू होतेय खरी. पण इतका विचार नव्हता केला Happy