घुंगरू

स्त्री शक्ती

Submitted by १८तन्वी on 17 July, 2025 - 02:27
मराठी कला, डिजिटल पेंटिंग, स्त्री शक्ती, घुंगरू, नृत्य, सुरेश भट कविता, Indian Classical Dance, Digital Art, Woman Empowerment, Tanvi Art

अखेर, खूप दिवसांपासून मनात असलेलं हे 'रत्न' कॅनव्हासवर उतरलं! हे डिजिटल पेंटिंग पूर्ण करताना एक वेगळंच समाधान मिळतंय.

हे चित्र माझ्या प्रतिभावान छायाचित्रकार मित्र, विकास, याने टिपलेल्या एका अविस्मरणीय क्षणावर आधारित आहे. त्याला माझा मानाचा मुजरा! त्याने कॅमेऱ्यात केवळ एक नृत्यमुद्रा नाही, तर स्त्रीच्या अस्तित्वाचं जणू सारच कैद केलं आहे. जमिनीवर स्थिर असलेली पाऊले तिचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य दाखवतात, तर किंचित उचललेली टाच तिची नजाकत आणि गतिशीलता दर्शवते. यात एकाच वेळी लालित्य, शांतता, सामर्थ्य, आत्मविश्वास आणि ओळख अशा सर्व भावनांचं दर्शन घडतंय असं मला वाटतं.

Subscribe to RSS - घुंगरू