विमान अपघातातील मृतांची ओळख : ‘डीएनए’ आणि अन्य चाचण्या
Submitted by कुमार१ on 16 June, 2025 - 06:32
मानवी जीवनात वेळप्रसंगी समाजाला गंभीर अपघात आणि अनेक सामूहिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. अशा आपत्तींमध्ये भीषण विमान अपघात, भयानक आगीच्या घटना, भूकंप, चक्रीवादळे, महापूर आणि विविध युद्धांचा समावेश आहे. अशा दुर्दैवी आपत्तीत जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते. अशा प्रसंगी एकत्रित विखुरलेल्या अनेक मृतदेहांची ओळख पटवणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि जिकीरीचे काम असते. हा विषय मानवी भावना, प्रशासकीय आणि कायदेशीर दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. विमान अपघातासारख्या भयानक घटनांमध्ये मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत विखुरले जातात.
विषय:
शब्दखुणा: