वसंताचे गाणे

चरैवेति चरैवेति

Submitted by रानभुली on 15 June, 2025 - 09:41

निळी रेशमी फीत नक्षीली
आसमंताची झाकते लाली
पुन्हा हवेत लहरत जाते
कोकिळेची शीळ गोडुली

त्या देशाचा सुगंधित वारा
परिमळतो किरमिजी बनातून
कोवळाईचा बहर पाहतो
उमलणार्‍या वेलींची स्वप्ने

तरूणाईच्या ऋतूचा सोहळा
क्षितिजाच्या सीमेवरती
आम्रवृक्षाच्या छायेमधे
पौर्णिमेच्या भरतीसंगे
दर्यासारखा फुलून येतो !

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वसंताचे गाणे