माझी मायबोली

माझी मायबोली (२००५-२५) : मागे वळून पाहता

Submitted by हेमंतकुमार on 13 February, 2025 - 07:22

होय, तो २००५सालचा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिनाच होता. परदेशात विनाकुटुंब आलो होतो त्याला जेमतेम अडीच महिने झाले होते. तिथल्या एका राष्ट्रीय रुग्णालयात सल्लागाराचे पद मिळालेले. स्वतंत्र केबिन आणि तिच्यात शिरताच एक प्रशस्त असे टेबल आणि त्यावर ऐटीत बसलेला डेस्कटॉप कम्प्युटर. तेव्हाचे संगणक त्यांच्या लवाजम्यासहित असल्यामुळे बऱ्यापैकी जागा व्यापत. भारतात संगणकाचे गमभन शिकून फक्त वर्षच झालं होतं. लँडलाईन फोनवरून इंटरनेटची जोडणी असला उद्योग मायदेशी करून पाहिलेला होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझी मायबोली