विस्मरण

स्मृतिभ्रंशाची गोष्ट

Submitted by प्रज्ञा९ on 23 January, 2025 - 05:02

चिकवा धाग्यावर गोल्डफिशबद्दल अस्मिता, स्वाती आणि माधव यांच्या पोस्ट्स वाचल्या. मी मुळातच सिनेमा खूप कमी बघते, पण तरी या मंडळींच्या पोस्ट्सनी माझ्या बाबतीत, संथ पाण्यात लहानसा दगड पडून लहरी उठाव्यात, असं काहीतरी झालं. विस्मरण, स्मृतिभ्रंश, डिमेन्शिआ, अल्झायमर... एकाच कुटुंबातले आजार म्हणायचे, जे माणसाचं अस्तित्त्वच उलटंपालटं करून टाकतात. मी इथे सिनेमाबद्दल लिहिणार नाहिये, कारण तो मी अजून पूर्ण बघितला नाहिये, पहिला अर्धा तासच बघितलाय. डोळे भरून येतात असं काही बघताना, त्यामुळे एका बैठकीत तो पूर्ण होणार नाहीच. पण माझ्या घरातलं काहीतरी इथे शेअर करावंसं मात्र नक्की वाटलं मला.

ती

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 17 November, 2024 - 10:21

ती क्षणा क्षणाला झुरते, ती कणा कणाने मरते
ती तिच्याच नजरे मधुनी जग अनोळखी हे बघते
मन पटलावरती जे जे लिहिलेले होते सगळे
का कागद दिसतो कोरा ती विसरत आहे सगळे

गर्दीत एकटी असते वाटेत असे एकाकी
या मनास भासे आता घर अंगण दारे परकी
डोळ्यात साठल्या गहिऱ्या विझलेल्या जीवन ज्योती
गुंतला जीव ना कोठे ना कसली नाती गोती

वाटेत विखरुनी गेली पिकलेली पिवळी पाने
फांदीस धुमारे आता ना फुटती नव्या दमाने
का अनोळखी रस्त्याने पाउले चुकीने पडती?
थकल्या शिणल्या गात्रांना पैलाची गाणी स्मरती

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विस्मरण