योगीराज

योगीराज

Submitted by शिवाजी उमाजी on 9 July, 2017 - 22:55

योगीराज

म्हणे कोणी आहे, नित्य निराकारी!
वसे चराचरी, तो ईश्वर!!१!!  

सावळा म्हणोनी, लागे कुणा लळा!
देखीला का डोळा? परब्रम्ह!!२!!

वंश ज्याचा असे, सर्वा भुतां जगी!
तोची आत्म योगी, योगीराज!!३!! 

झाकता अंतरी, गवसला अंश!
असे जो परमेश, जगताचा!!४!! 

जगोनी भ्रमात, व्यर्थिले जीवन!
दिले दोष दान, देवाजीस!!५!! 

म्हणे शिवा ऐसे, उगा मनी आले!
देवाजी जाणिले, दोषा परी!!६!!

© शिवाजी सांगळे, मो.+91 9545976589

शब्दखुणा: 

योगीराज समाधितून व्हा जागे (सरलेल्या गजानन महाराज शताब्दी सोहळ्या निमित्त)

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 28 October, 2010 - 04:11

new-2.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - योगीराज