हळदी कुंकू
हळदीकुंकू
शब्दांकन: तुषार खांबल
३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण सर्व सज्ज होतो ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. जानेवारी महिना जसे नवे वर्ष घेऊन येतो तसेच अनेक संकल्प घेऊन येतो. यातील काही संकल्प पूर्ण होतात तर काही अर्ध्यातच संपुष्टात येतात. यातील एक महत्वाचा संकल्प जे बरेच जण दरवर्षी ठरवतात तो म्हणजे सर्वांशी चांगलं वागण्याचा आणि गोड बोलण्याचा. कदाचित याचमुळे या महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीला "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" हे वाक्य जन्मास आलं असावं. असो...... आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे समस्त महिलावर्गाचा आनंदाचा विषय म्हणजे हळदी-कुंकू.