मुलं जास्त स्वच्छ राहतात कि मुली ?
          Submitted by ढंपस टंपू on 12 July, 2023 - 23:04        
      
    मुलं जास्त स्वच्छ असतात कि मुली हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेत असताना एक मुलगी आम्हाला म्हणाली होती " बॉईज आर डर्टी" .  मुलांचे मैदानी खेळ मातीत असतात.  आत्ताच्या शाळात सिमेंट असेल असले तर. पण आम्ही तर मातीतच खेळायचो. त्यात युनिफॉर्म पांढरा स्वच्छ  शर्ट आणि करडा टाय होता.  करड्या निळ्या रंगाची हाफ / फुल पँट असायची.   मातीने कपडे भरून जायचे. मुलींचा युनिफॉर्म काळपट निळा होता. त्याच्यावर धूळ समजून यायची नाही.  हे कारण असेल. 
पण नंतर पण मुलींचं हे मत नेहमी ऐकू यायचं. मी तर रोज  स्नान करायचो.  अजून करतो. रोज केस पण धुतो.
उलट मुली आठवड्यातून एकदाच केस धुतात. 
शब्दखुणा: 
 
 