ही काही गोष्ट असू शकत नाही

ही काही गोष्ट असू शकत नाही...

Submitted by संप्रति१ on 25 December, 2022 - 02:18

त्याचं झालं असं की कालपरवाकडे एकीने 'एक्सक्युज मी अंकल' म्हणून माझा अपमान केला. मी पण 'बोला मावशी' म्हणून परतफेड केली. त्यावेळी मी चेहऱ्यावर नेहमीचंच भंपक हाफ-स्माईल धारण केलेलं. त्यामुळे ती हसायला लागली. अपमान परिणामकारक झाला नसावा, असं मला वाटलं.
पत्ता शोधत होती बाय द वे.

"एफसी रोडला कुठून जायचं काका ?" तिनं पुन्हा एकदा
अपमान केला.. ह्यावेळी ठरवून. आणि मातृभाषेतून..!

"आता ह्या वयात एफसी रोडला जाऊन काय करणार मावशी तुम्ही??" मी जवाबी हमला केला.

Subscribe to RSS - ही काही गोष्ट असू शकत नाही