भाजीच्या दुकानात मिळालेल्या पिशवीच्या साधारण १/२ इंच जाडीच्या पट्ट्या कापुन घेतल्या. गाठी मारुन त्या एकमेकींना जोडुन घेतल्या. त्यांचा गोल गुंडा तयार केला. आणि क्रोश्याच्या सुईने (नेहमीच्य पद्धतीने) विणकाम केले.
सगळे पुर्ण खांब आहेत आणि जाळीसाठी साखळ्या विणल्या आहेत.
साईज प्रमाणे उपयोग करता येईल.
१. टी कोस्टर
२. टेबल मॅट
३. छोट्या कुंडी / फ्लॉवरपॉट खाली
४. एखाद्या छोट्या मुर्ती खाली

या वेळच्या शिवणासाठी आठवणीने रीसायकलिंग हा शब्द न वापरता अप्सायकलिंग हा शब्द वापरत आहे.
एका जुन्या सलवारची पायाकडची बाजू वापरली आहे. आत फोम आणि अस्तर. यात एक कप्पा केला आहे.

मेन्दी वपरून निरनिराळ्या मटेरिअल वर प्रयोग करणे नेहेमीच चालु असते त्यात गणेश उत्सवात ठेवलेल्या 'टाकाउतून टिकाउ' च्या निमित्तानी बर्याच टाकाउ वस्तु रंगवायची प्रेरणा मिळाली :).
अता दिवाळी निमित्त वेळ मिळेल तसं एक एक सामान बाहेर काढतेय :).
हा जुना डबा , पेडिक्युअर कोस्मॅटिक किट चा ( (पत्र्यासारखं मटेरिअल आहे.)

रिकामा डबा खूप दिवसापासून अडगळीत पडून होता पण इतका छान आकार आहे म्हणून फेकून दिला नाही,
शेवटी दिवाळी निमित्त एकदाचा बाहेर काढून रंगवायचा मनावर घेतलं :).