टाकाऊतून टिकाउ : दिवाळी स्पेशल भाग १

Submitted by दीपांजली on 18 October, 2010 - 18:29

मेन्दी वपरून निरनिराळ्या मटेरिअल वर प्रयोग करणे नेहेमीच चालु असते त्यात गणेश उत्सवात ठेवलेल्या 'टाकाउतून टिकाउ' च्या निमित्तानी बर्‍याच टाकाउ वस्तु रंगवायची प्रेरणा मिळाली :).
अता दिवाळी निमित्त वेळ मिळेल तसं एक एक सामान बाहेर काढतेय :).
हा जुना डबा , पेडिक्युअर कोस्मॅटिक किट चा ( (पत्र्यासारखं मटेरिअल आहे.)

tt4.jpg

रिकामा डबा खूप दिवसापासून अडगळीत पडून होता पण इतका छान आकार आहे म्हणून फेकून दिला नाही,
शेवटी दिवाळी निमित्त एकदाचा बाहेर काढून रंगवायचा मनावर घेतलं :).
डब्याच्या मधे जी पारदर्शक प्लॅस्टिक्/अ‍ॅक्रिलिक सारख्या मटेरिअल छोटीशी खिडकी आहे त्यामुळे आत दिवा लावायची आयडिआ सुचली.
वापरलेले टाकाउ मटेरिअल :
जुना डबा
जुने मेंदीचे कोन
फेकून द्यावा लागेल असा जुना रवा
इतर साहित्यः
कोन मधे भरलेले 3D colors, rhinestones, golden acrylic paint, transparent sealer paint, टी लाइट होल्डर.
कृति:
१.डब्याला प्लेन सोनेरी रंग २ कोट्स मधे लावला आणि वाळल्यावर मेन्दी , rhinestones वापरून डिझाइन काढलं.
२.त्या पारदर्शक खिडकीवर पणती रंगवली .
३. मेंदी आणि इतर रंग वाळल्यावर क्राफ्ट सिलर लाऊन वाळायला ठेवलं.
४. वाळल्यावर डब्याच्या आत मधे टि लाइट ठेवला .
त्याची लेव्हल बरोबर त्या पारदर्शक खिडकीवर रंगवलेल्या पणतीच्या ज्योतिला मॅच होईल अशी अ‍ॅड्जस्ट केली , खरं तर लेव्हल थोडी अजुन उंच चालली असती, नंतर लक्षात आलं.( लेव्हल मॅच करण्या साठी डब्यात अजुन एक टाकाउ वस्तु अ‍ॅड केली, जुना बारिक रवा, जो खराब निघाला होता, रांगोळी किंवा सँड पेन्टिंग सारखा वापर करावा म्हणून ठेवला होता, जो इथे कामी आला.).

DSC02080-2.jpg

५. ही स्टेप काही ठरवली नवह्ती पण सहज जमून गेली:).
काचेचे काही टिलाइट होल्डर दिवाळी निमित्त रंगवले होते, त्यातला सोनेरी रंगवलेला होल्डर या डब्याच्या रंगाशी मॅच करत होता, प्रयोग म्हणून डब्यावर वर उलटा ठेवला ,देवळा सारखा आकार दिसत होता म्हणून हे काँबो आवडल, त्यात पण एक टि लाइट ठेवला Happy
नंतर हिरव्या-सोनेरी रंगानी रंगवलेले अजुन २ टि लाइट होल्डर सेट म्हणून बाजुला ठेवले:).

tt3.jpg

अर्थात हे टिलाइट्स ऑन ऑफ स्विच नी ऑपरेट होणारे आहेत म्हणून बन्द डब्यातत आणि उपड्या ग्लास होल्डर मधेही ज्योत प्रज्वलित आहे :).

हे इतर टि लाइट होल्डर्स
tt6.jpg

गुलमोहर: 

मस्तच गं डीजे! Happy

प्लेन काचेच्या टी-लाईट होल्डर पेक्षा हे असे सजवलेले होल्डर्स किती मस्त दिसतायत!

जबरी!
हे ३डी कलर कुठे मिळतात. तसच गणेशोत्सव स्पर्धेत वापरलेले बॉडी पेंट कुठे मीळतिल?
दिवाळीत काहीतरी करेल.
टि-लाईट होल्डरही सुरेख झालेत. तु रंगवलेस की कलरफुलच होते.

थेंक्स सर्वांना !
प्राजक्ता,
टी लाइट होल्डर साधे काचेचे प्लेन होते, ते पण रंगवले , नंतर थ्री डी कलर्स कोन मधे घालून वरून डिझाइन काढलं.
थ्री डी कलर्स फेविक्रिल चे असतत बहुतेक भारतात ट्य्युब मधे, वापरले होते मी पण बरीच वर्षं झाली.
यु.एस मधे मायकेल्स मधे तर प्रचंड व्हरायटी मिळेल, मी हे फॅब्रिक कलर्स वापरलेत घरात होते म्हणून पण नक्कीच स्पेशल ग्लास पेंटिंग चे पण मिळत असतील.
बॉडी पेंट्स दुकानात नाही मिळणार, ऑनलाइन स्प्लायर्स आहेत बरेच, तुला रेफरन्स हवा असेल तर सांग पण खरं तर स्किन व्यतिरिक्त इतर माध्यमांवर आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट कलर जास्त छान दिसतील, तेंव्हा स्पर्धेत टाकाउ सामान वापरायचं म्हणून मी उरलेले बॉडीपेन्ट कोन्स वापरले.

Pages