माय्बोली गणेशोत्सव २०२२

कथाशंभरी २- "रघ्वात्मजप्रतापकाव्यम :) "-अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2022 - 08:46

अंगणात येवोनीया
रघू पाहे बंद घर
दारावर होता ज्याच्या
षण्मासीचा धूळ थर  

बोले रघू स्वत:शीच
"काल चंद्रप्रकाशात
पाहिले मी कोणीतरी
दारापाशी होते जात?"

नीट निरखून पाहे
दारावरची अक्षरे
"पुन्हा येईन मी रात्री
नको देऊस पहारे" 

रघू पडला कोड्यात
"कोण इथे येतो जातो?
धूळभर्‍या दारावर
कोण संदेश लिहीतो?"

Subscribe to RSS - माय्बोली गणेशोत्सव २०२२