वृद्धांचा आहार

वृद्धांच्या आहाराच्या रुचकर पाककृती

Submitted by गजानन on 10 June, 2022 - 11:57

नमस्कार,

वृद्धांकरता विशेषतः दात नसलेल्या वृद्धांकरता रुचकर, सहज खाता येतील, पचायला हलके, पौष्टीक आणि आलटून पालटून रोज करता येतील अश्या आहारांच्या पाककृतींबद्दल / पदार्थांबद्दल लिहिण्याकरता हा धागा काढत आहे. हे सगळे एकदम साधणे अवघड आहे. पण त्यातल्या त्यात समतोल असे काय बनवता येईल याची माहिती हवी आहे. रोज नुसतेच फळांचे रस आणि घटाघटा पिता येतात असे (वाटलेला डाळभात इ.) पदार्थ यांनी ते लगेच कंटाळतात. त्याच त्याच पदार्थांमध्ये किती आणि कशी विविधता आणावी हा मोठा प्रश्न पडतो. शिवाय यातून सगळे आवश्यक घटकही मिळत नाहीत.

यासंबंधीची माहिती कृपया इथे लिहा / लिंक द्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वृद्धांचा आहार