Submitted by गजानन on 10 June, 2022 - 11:57
नमस्कार,
वृद्धांकरता विशेषतः दात नसलेल्या वृद्धांकरता रुचकर, सहज खाता येतील, पचायला हलके, पौष्टीक आणि आलटून पालटून रोज करता येतील अश्या आहारांच्या पाककृतींबद्दल / पदार्थांबद्दल लिहिण्याकरता हा धागा काढत आहे. हे सगळे एकदम साधणे अवघड आहे. पण त्यातल्या त्यात समतोल असे काय बनवता येईल याची माहिती हवी आहे. रोज नुसतेच फळांचे रस आणि घटाघटा पिता येतात असे (वाटलेला डाळभात इ.) पदार्थ यांनी ते लगेच कंटाळतात. त्याच त्याच पदार्थांमध्ये किती आणि कशी विविधता आणावी हा मोठा प्रश्न पडतो. शिवाय यातून सगळे आवश्यक घटकही मिळत नाहीत.
यासंबंधीची माहिती कृपया इथे लिहा / लिंक द्या.
(अॅडमिन, कृपया हा धागा पाककृतीच्या ग्रूपमध्ये हलवावा ही विनंती.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकाळच्या नाचणी सत्वाची गूळ
सकाळी नाचणी सत्वाची गूळ घालून किंवा जीऱयाची फोडणी घातलेली पेज देता येईल. (नाचणी सत्व बाजारात मिळतं)
अधेमधे खायला राजगिरा लाडू दूधात भिजवून खाता येईल
सूपचे प्रकार देऊ शकता
ओट्स किंवा किनवा हे फार
ओट्स किंवा किनवा हे फार वर्साटाइल आहे. ते वापरून खिचडी, पुलाव, उपमा, साबुदाण्याची खिचडी अशा देशी पद्धतीच्या चवींचे पदार्थ बनवता येतात.
खायची आवड असेल, चवदार खायला
खायची आवड असेल, चवदार खायला आवडत असेल तर दात नसले, पेअर मध्ये (म्हणजे वरचे आणि खालचे एकत्र) नसले तर तोंडात घोळवुन मऊ होणारे पदार्थ वृद्ध तासनतास चघळून खाऊ शकतात/ खातात. किंवा मिक्सर मध्ये बारीक करुन देता येतील.
मुद्दाम पौष्टिक पेज इ. करुन दिलीत तर कोण रोज खाईल ती? आपल्याला आवडेल का रोज फारशी चव नसलेली/ गोडट चव असलेली पेज?
आपण खातो तेच बारीक कुस्करुन गोड असेल तर दुधात, सेवरी असेल तर थोड्या ताकात एकत्र करुन द्या, म्हणजे तोंडात घास घोळतो असं होणार नाही आणि ओलसरपणा असेल. ओलसरपणा असला की घास गिळता येतो. बारीक केलेला असल्याने नुसता गिळला तरी काही होत नाही. रोजचं जेवण असल्याने तोंड घास गेल्यावर आवडती/ ओळखीची चव आली की जेवल्याचं समाधान मिळेल.
आजीला चकली आवडायची, एकदम टणक तिळगुळाचे लाडू आवडायचे. दात गेल्यावर एकेक तुकडा मन लावुन चघळून खायची चकलीचा.
पण तुकडा कडकच/ खुसखुशीतच पाहिजे. नरम झाला की नको म्हणायची. तीच गत तिळगुळाची. बाहेरचे मऊ लाडू नको असायचे. पक्क्या पाकातलेच आवडायचे. फक्त तिळगुळात शेंगदाण्याचे तुकडे आले की प्रश्न पडायचा कारण तो मऊ होत नाही चटकन..फेकवत नाही आणि गिळवत नाही, नुसता तोंडात घोळतो म्हणायची.
सुप्स (ज्या कुठल्या भाज्या
सुप्स (ज्या कुठल्या भाज्या आवडतील त्याचे.गाजर, सेलरी, बीन्स घालुन) , चीली( रेसीपी उपलब्ध आहेत. पदार्थ इकडचा असला तरी भारतात सहज शक्य आहे.) , नाचणी , गव्हाच्या, ज्वारीच्या आंबोळ्या.
तांदूळ, ज्वारी,भाजणी यांची
तोंडात फार वेळ घोळवणे हे ओरल
तोंडात फार वेळ घोळवणे हे ओरल हायजीनला चांगले नाही
जेवण म्हटले की ते दहा वीस मिनिटात पूर्ण करून तोंड धुणे अपेक्षित आहे
A2 milk + nutritional
A2 milk + nutritional supplementary powders like horlicks protein, horlicks malt , fresubin , liveeasy
फळे , भाज्या उकडून puree यात मसाल्याचे पदार्थ , herbs घालून
मऊ पदार्थ खाता येत असतील तर शिरा, सांजा (तिखट), उपमा, उकड, ढोकळा, इडली, डोसे- आंबोळ्या - पॅनकेक्स. यात वेगवेगळ्या डाळी /पिठं वापरता येतात. दूधपोहे, चहापोहे.
ओट्स . प्लेन तसंच सफोलाचे वेगवेगळ्या चवींचे मिळतात.
रव्याची, तांदळाची ,शेवयांची खीर , मुगाचं कढण
वरणभात मिक्सरमधून काढण्याऐवजी डाळ तांदूळ + मसाल्याचे पदार्थ भाजून वाटून हे सगळं वाटून खिरीसारखं शिजवून.
मिक्सरपेक्षा पर्सनल ब्लेंडर उपयुक्त. मी क्रोमाचा घेतलाय.
रुग्णास देण्यासाठी पातळ किंवा
रुग्णास देण्यासाठी पातळ किंवा द्रवरूप आहार
https://www.maayboli.com/node/61192
रुग्णास देण्यासाठी पातळ किंवा
द्विरुक्ती झाल्यामुळे संपादीत.
प्रतिसादांबद्दल आणि
प्रतिसादांबद्दल आणि दुव्यांबद्दल अनेक धन्यवाद.
तासन् तास चघळत राहणे जमत नाही (आणि अपेक्षितही नाही). खाण्याची इच्छा कमी. (खरे सांगायचे तर बोलण्यात गुंतवून कसेतरी खाण्यासाठी राजी करावे लागते. नाहीतर 'मला काहीच नको, भूक नाही' हे बंड पुकारले जाते, ज्याने शर्करापातळीची धडकी भरते.) एकदम पातळ द्रवापेक्षा थोडेसे घट्ट, मऊ, एकदम गिळण्यापेक्षा तोंडात थोडेसे घोळवून (किमान लाळ मिसळली जावी), असे अन्न मानवतेय असे लक्षात आलेय. त्यासाठी थोडे रुचकर पर्याय उपयुक्त होतील. जेणेकरून पुन्हा ते खायची इच्छा होईल.
वरणभात मिक्सरमधून काढण्याऐवजी डाळ तांदूळ + मसाल्याचे पदार्थ भाजून वाटून हे सगळं वाटून खिरीसारखं शिजवून. <<< भरत, युक्तिबद्दल धन्यवाद. आम्ही शिजवून मिक्सरमधून काढतो. त्याऐवजी हे करून बघता येईल. दूध आणि प्रोटीनच्या पूरक पावडरी वरचेवर घेतल्यावर आमच्याकडे पचनाची भट्टी बिघडते, त्यामुळे ते बेतानेच देता येते.
उकड: तांदळाच्या उकडीचे मुटकुले, गव्हाची वरणफळे हे चालेल. ज्वारीच्या उकडीबद्दल शोधतो.
पुन्हा धन्यवाद.
अनया, हाच धागा द्यायला आले
अनया, हाच धागा द्यायला आले होते.
अरूंधतीचा हा धागा फार उपयुक्त आहे, तिच्या बाकी लेखनाप्रमाणेच.
खाणे मिक्सरला वाटले की चवच
खाणे मिक्सरला वाटले की चवच जाते पार. त्यापेक्षा घटक पदार्थ बारीक करून मऊ शिजवून बरीच बरी चव आणता येते.
इडली, डोसा (मऊ), ढोकळे, मऊ
इडली, डोसा (मऊ), ढोकळे, मऊ भाकरी, उकड, खीरी, सूप्स, धिर डी, लाह्यामचे पीठ तूप गूळ किंवा दूध साखर घालून
तोंडात घास चावणे किंवा घोळवणे
तोंडात घास चावणे किंवा घोळवणे मला गरजेचे वाटत नाही. मी गिळतो. पोट पुढचे काम करते.
अगदीच मऊ नको असेल, चालत्त
अगदीच मऊ नको असेल, चालत्त असेल तर कमी तेलाची, भरपूर भाज्या घातलेली पावभाजी चालेल. मेथीची भाजी घालून वरणफळे, भरपूर भाज्या घालून पुलाव वगैरे चालत असेल तर देता येईल.
इन्द्रयनि तन्दुल अनि मुगचे
इन्द्रयनि तन्दुल अनि मुगचे वरन
माझी आजी हुलगे भाजून जात्यावर
माझी आजी हुलगे भाजून जात्यावर भरड दळून ठेवायची. त्याचे पाण्यात भिजवून कधी मीठ तर कधी गूळ घालून, तांदळाच्या कण्या घालून शिजवून माडगे बनवून खायची / प्यायची. खूप पौष्टिक असते ते.