#निसर्ग #आयुष्य

सहज

Submitted by अदिती ९५ on 16 May, 2022 - 08:28

तप्त धरेला शांत कराया
जैसे पर्जन्याचे येणे
तितुके सहज असावे नाते
एखाद्याशी एखाद्याचे

मोगरा देई गंध मोगरी
गुलाबाचा सुगंध गुलाबी
तितुकी सहज जपावी
ज्याने त्याने आपुली छबी

सूर्याचे ऊन, झाडाचा आहार
प्राणवायू सृष्टीचा आधार
इतुका सहज घडावा
माणसातला व्यवहार

मृग शोधी सारीकडे
आजन्म आपुली कस्तुरी
म्हणोनी ध्यानी ‌असावे
आनंद वसे तव अंतरी

फुलांचे उमलणे, बहरणे
सुकणे आणिक गळणे
इतुके सहज असावे
एखाद्याचे आयुष्य जगणे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #निसर्ग #आयुष्य