Submitted by अदिती ९५ on 16 May, 2022 - 08:28
तप्त धरेला शांत कराया
जैसे पर्जन्याचे येणे
तितुके सहज असावे नाते
एखाद्याशी एखाद्याचे
मोगरा देई गंध मोगरी
गुलाबाचा सुगंध गुलाबी
तितुकी सहज जपावी
ज्याने त्याने आपुली छबी
सूर्याचे ऊन, झाडाचा आहार
प्राणवायू सृष्टीचा आधार
इतुका सहज घडावा
माणसातला व्यवहार
मृग शोधी सारीकडे
आजन्म आपुली कस्तुरी
म्हणोनी ध्यानी असावे
आनंद वसे तव अंतरी
फुलांचे उमलणे, बहरणे
सुकणे आणिक गळणे
इतुके सहज असावे
एखाद्याचे आयुष्य जगणे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली !
आवडली !
काय गोड कविता आहे. खूप आवडली.
काय गोड कविता आहे. खूप आवडली.
प्रसन्न पहाटे वाचताना तर प्राजक्ताच्या सड्यासारखी वाटली
खूप खूप धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद !