पांढरं फरवालं स्वेटर
          Submitted by बिपिनसांगळे on 12 January, 2022 - 13:27        
      
    पांढरं फरवालं  स्वेटर
-------------------------
खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी  !
रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं .
नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं  म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ...  माणसंच की ती  - परिस्थितीने फटकारलेली .
तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत .
विषय: 
शब्दखुणा: 
 
 