न बोलता

न बोलता

Submitted by वैभव जगदाळे. on 2 October, 2021 - 16:44

मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना तीने पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. होस्टेलवर राहत असल्यामुळे येता जाता दिसायची. कपाळावर छोटासा काळा गंध. केस नेहमी बांधलेले. डाव्या बाजूने केसांची एक बट सतत गालाशी लगट करत असायची. मग ती तिच्या नाजूक करंगळीने हलकेच ती बट कानामागे सरकवायची.ती हे करत असताना ही वेळ पुढे सरकूच नये असं वाटायचं. माझ्यासह कॉलेजमधल्या कित्येक पोरांच्या काळजाचा ठोका तिने चुकवला होता. काहीही करून हिच्याशी जवळीक कशी साधता येईल याचे मार्ग शोधायला मी सुरुवात केली. तसं हे काम म्हणजे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - न बोलता