शशक पूर्ण करा - देवी - Bhakti Salunke
Submitted by Bhakti Salunke on 17 September, 2021 - 05:21
काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातोय.
"अगं आई पण मला एकट्यात विचारायचं नं? डायरेक्ट देवीला कौल?"
"अरे त्यात काय? आजचा मंगळवार, देवी आलीच होती, विचारलं. दहा वर्ष झालीत तुमच्या लग्नाला, कूस उजवली नाहीये. दुसरा मार्ग नको शोधायला?"
"काही काय? बरं, मी जरा औषधांच बघतो. काळजीच कारण नाही म्हणालेत डॉक्टर. पण अंगात देवी असताना ही बेशुद्ध कशी झाली अचानक?" बेडवर झोपलेल्या माझ्याकडे बघून ह्यांचा प्रश्न...
विषय:
शब्दखुणा: