शशक पूर्ण करा - देवी - Bhakti Salunke

Submitted by Bhakti Salunke on 17 September, 2021 - 05:21

काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातोय.

"अगं आई पण मला एकट्यात विचारायचं नं? डायरेक्ट देवीला कौल?"
"अरे त्यात काय? आजचा मंगळवार, देवी आलीच होती, विचारलं. दहा वर्ष झालीत तुमच्या लग्नाला, कूस उजवली नाहीये. दुसरा मार्ग नको शोधायला?"
"काही काय? बरं, मी जरा औषधांच बघतो. काळजीच कारण नाही म्हणालेत डॉक्टर. पण अंगात देवी असताना ही बेशुद्ध कशी झाली अचानक?" बेडवर झोपलेल्या माझ्याकडे बघून ह्यांचा प्रश्न...

आता ह्यांना काय माहीत? दुसऱ्यांच्या आयुष्याची कोडी सोडवणे फार सोपं. पण स्वतःच्या माहित नसलेल्या भविष्याच कोडं देवी तरी कसं सोडवणार?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !

वावे, धनुडी, हा आशिक (सॉरी, पूर्ण लिहिता येत नाहीये), केया, वीरू, सगळ्यांना धन्यवाद.
खरंतर मी माबोवर ९ वर्षापासून आहे पण लिखाणाचा हा पहिलाच प्रयत्न. म्हणून तुमच्या प्रतिक्रिया अजूनच खास माझ्यासाठी.
थँक्यू परत एकदा.

छान जमलीय.
नऊ वर्षानंतर लिखाणाचा पहिला प्रयत्न हेच एक मोठे धाडस आहे Happy

धन्यवाद सामो.

@ऋन्मेष : माझ्यापुरतं तरी धाडस आहे. संस्थळावर लोकं लिखाणासाठी डू आयडी घेतात आणि मला आईडी घेवून लिखाण करायला ९ वर्ष लागली. Happy

छान कथा..!
पहिलाच प्रयत्न छान जमलायं...!

संस्थळावर लोकं लिखाणासाठी डू आयडी घेतात
>>>>
हा हा, हे मलाच सांगणे हा योगायोग की टोमणा Proud
जोक्स द अपार्ट हो खरेय, पण हे एखाद्या वॉटरपार्कमधील स्लाईड सारखे आहे. पहिली हिंमत करून जमायला हवी. मग कळते की यात धाडसाचे काही काम नसते. फक्त मनात भिती असते. आणि ईतकी मजा येते की मग हे पुन्हा करावेसे वाटते Happy

टोमणा नाही. जे वाटलं ते लिहिलं. तुम्ही एकदम चपखल उपमा दिलीय. त्या भीतीवर मात करता यायला हवी, बास्स. Happy

@रूपाली : धन्यवाद Happy