अस्ताव्यस्त येता जाता

तुटक तुटक..

Submitted by पाचपाटील on 15 August, 2021 - 05:38

१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या
उचंबळून येण्याचा प्रवाह मुक्त असतो.. पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ फक्त त्यांच्या मालकांच्या दिशेनेच..

२. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत..
समोर स्तब्ध पाण्याचा पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा..
थरथरतो.. वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे..
झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी मान डोलावली...

Subscribe to RSS - अस्ताव्यस्त येता जाता