घळई

घळईतला मृत्यू ( रहस्यकथा)

Submitted by करभकर्ण on 13 June, 2021 - 02:40

बैलगाडी संथगतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण  एका लयीत शांत शांत भासत होते. परतीचे पाखरे अधून मधून नजरेस पडत होते. बैलगाडीचा तो खडs खडss आवाज, या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून, त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणता अजून, सहा मैल बाकी असेल. खरंतर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती. कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार, आजूबाजूला पसरणार होता. पण त्यांची ती संथ चाल आहेत तशीच कायम होती.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - घळई