हट्टीपणा

Submitted by रमेश पुष्पा on 6 June, 2021 - 14:58

खाताना तुकडे तुकडे करून खाणार,
तरीही चपाती गोल गोल हवी.

पिताना कोमट करून पिणार,
तरी कॉफी गरम गरम हवी.

घालताना झटकून घालणार,
तरीही कपड्यांना कडक इस्त्री हवी.

जनतेकडे दुर्लक्ष केले तरी,
जनतेची मते हवी.

गाडी चालवायला येत नाही तरी,
मोठी गाडी हवी.

घर सांभाळायला येत नाही तरी,
घराची चावी हवी.

ढीगभर साड्या असल्या तरी,
नवीन कोरी साडी हवी.

अभ्यासाचा कंटाळा वाटत असला तरी,
पुस्तकाची माडी हवी.

दुसऱ्यांशी नीट वागता येत नाही,
तरी मैत्रीचे नाते हवे.

आईवडिलांची सेवा केली नाही,
तरी प्रॉपर्टीचे वाटे हवे.

--रमेश पुष्पा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users