इथे थांबला काळ गड्यानो........

पानिपत

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 03:31

इथे थांबला काळ गड्यांनो
इथे थांबला काळ ।।धृ।।

पानिपतातली कत्तल बघुनी
मान घातली खाली तयाने
अमानुषतेचे दर्शन घडले
प्रथमच ढळले अश्रू तयाचे ।। धृ।।

युद्ध भयंकर सुर असुरांचे
तांडव दिसले सदाशिवाचे
कितीकांची पोटे फुटली
अन् कितीकांची बोटे तुटली ।।

कितीक किंकाळ्या मारीत मेले
कितीक अंगावर धावून गेले
आपुला परका भेद कळेना
तोपचीला मग काही दिसेना।। धृ।।

तोफांची तर बत्ती विझली
मराठ्यांचा विरोध ढळला
दिसे न वाली तेव्हा कोणी
देऊ लागले झुंज कडवी

Subscribe to RSS - इथे थांबला काळ गड्यानो........