जणू कोणी आत येत असल्याची वर्दीचा...................

दैवगती (भाग २)

Submitted by मिरिंडा on 14 May, 2021 - 05:33

जणू कोणी आत येत असल्याची वर्दीच दिली गेली. आतमध्ये मिट्ट काळोख होता. आतून मात्र एक प्रकारचा कुबट वास आला. तीन वर्षांपासूनची गुदमरलेली हवा तोंडावर आली. मॅनेजर एकदम आत जायला धजत नव्हता. त्याला तीन वर्षांपूर्वीचं पळालेलं गिर्हाइक आठवलं. त्या दिवशी रात्री साडे तीनच्या सुमारास घामाघूम होऊन भीतीने डोळे गरगर फिरवीत , थरथर सुटलेला  कौंटरजवळ धावत आलेला तो मध्यमवयीन माणूस त्याला आठवला. त्याचं सामानही त्याने नेलं नव्हतं. अचानक सदाशिवचा आवाज येऊन तो भानावर आला. एक पाय आत टाकीत त्याने अंदाजानेच लायटाचं बटण दाबलं. मंद पिवळसर प्रकाशात  ते दोघे आत उभे राहिले. खोली चांगलीच प्रशस्त होती.

Subscribe to RSS - जणू कोणी आत येत असल्याची वर्दीचा...................