काळजातलं प्रेम आहे हे समजून घे न बोलता काही इशारा ओळखून घे

समजून घे

Submitted by विनोद इखणकर - श... on 1 February, 2021 - 13:44

शीर्षक - समजून घे

काळजातलं प्रेम आहे हे समजून घे
न बोलता काही इशारा ओळखून घे

जे काल लिहिले ते शब्द माझेच होते
एकदा त्या प्रेमपत्राला वाचून घे

जे घडायचे होते ते घडुन गेले
जुन्या आठवणींना विसरून घे

मला माहितीये पुढची वाट काटेरी आहे
पण पाय तुझा हातावरी माझ्या उचलून घे

तोड हे अंतर दुराव्यातले कायमचे
सुख माझ्या मिठीत येऊन घे

रडून रडून लाल झाले डोळे माझे
तुझ्या हातांनी आसवांना थांबवून घे

कितीसा विचार जुन्या रूढी परंपरेचा
अश्या बंधनातून सुटका करून घे

Subscribe to RSS - काळजातलं प्रेम आहे हे समजून घे न बोलता काही इशारा ओळखून घे