समजून घे

Submitted by विनोद इखणकर - श... on 1 February, 2021 - 13:44

शीर्षक - समजून घे

काळजातलं प्रेम आहे हे समजून घे
न बोलता काही इशारा ओळखून घे

जे काल लिहिले ते शब्द माझेच होते
एकदा त्या प्रेमपत्राला वाचून घे

जे घडायचे होते ते घडुन गेले
जुन्या आठवणींना विसरून घे

मला माहितीये पुढची वाट काटेरी आहे
पण पाय तुझा हातावरी माझ्या उचलून घे

तोड हे अंतर दुराव्यातले कायमचे
सुख माझ्या मिठीत येऊन घे

रडून रडून लाल झाले डोळे माझे
तुझ्या हातांनी आसवांना थांबवून घे

कितीसा विचार जुन्या रूढी परंपरेचा
अश्या बंधनातून सुटका करून घे

कशाला पांघरते काळोख्याची शाल अंगावरी
आता तरी जगण्याला रंगरंगोटी करून घे

आतुरले कान तुला ऐकण्यासाठी
बोलून माझ्याशी मौन सोडून घे

(ती बोलते............)

खेळ किती चालायचा नजरेतला
एकदाचे माझे चित्र रेखाटून घे

होकार कशी देऊ तुला मी
नकारातलं दुःख माझे जाणून घे

अर्ध्यात संसार मोडला माझा
तू सात जन्माची गाठ बांधून घे

- विनोद इखणकर
(शब्दप्रेम)
7350970201

Group content visibility: 
Public - accessible to all site users