बाल कविता

उंट जिराफ जिगरी दोस्त

Submitted by विदेश on 12 May, 2011 - 01:52

उंट जिराफ जिगरी दोस्त
फोटो काढू म्हणाले मस्त -
फोटो काढला हसरा छान
अडकून बसली मानेत मान !

कांगारू म्हणाले पिल्लाला
चल रे जाऊ फिरायला -
पिल्लू बसले ऐटीत
आईच्या पोटाच्या पिशवीत !

मोकळी हवा घेण्यासाठी
मासा पाण्याबाहेर आला -
बगळा स्वागत करण्यासाठी
एका पायावर तयार झाला !

ससोबा रॉकेटमध्ये बसून
पृथ्वीभवती गरगर फिरले -
ढगांचा गडगडाट ऐकून
चांदोबाच्या कुशीत शिरले !

गुलमोहर: 

वारांचे गाणे

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 8 May, 2011 - 09:47

महादेवाचा सोमवार
बेल वाहूया हिरवागार,

गणपतीचा मंगळवार
उंदीरमामाची शानच फार,

पांडुरंगाचा बुधवार
टाळ,चिपळ्या,बुक्का,हार,

दत्ताचा तो गुरूवार
आजोबांनी दिले पेढे चार,

जगदंबेचा शुक्रवार
आईला शालु हिरवागार ,

हनुमंताचा शनिवार
करा रामाचा जयजयकार,

खंडोबाचा रविवार

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भुकेला बंडू -

Submitted by विदेश on 24 September, 2010 - 07:00

लाडू चिवडा करती लढाई
दोघेही मारती बढाई
`मी आवडता `-`आवडता मी `
चवीत सा-या मीच नामी !
तिखटाशिवाय फराळ कसला !
गोडाविण तो फराळ कसला ?
तिखट गोड ते भांडु लागले
मदतीसाठी ओरडू लागले-
शेव चकली दोघी धावल्या
जामुन बर्फी करंज्या आल्या
ताटामध्ये सुरू जाहली
तू-तू मी-मी गंमत झाली
बंडू जवळी आला दिसता
पदार्थांमधे वसे शांतता !
...चव नसते गोडा-तिखटाला
जेव्हा असतो बंडू भुकेला !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बाल कविता