जा पाखरा उडून जा

जा पाखरा उडून जा

Submitted by विनोद इखणकर - श... on 22 December, 2020 - 10:55

शीर्षक- "जा पाखरा उडून जा"

भयभीत होऊन पाखरू पायाशी आलं
मी त्याला विचारलं तुला काय झालं

ते काही बोलेना अंगाला झालेल्या वेदना
त्याला काही सहन होईना

थोडावेळ शांत बसलं आणि मध्येच हसलं

बोलायला लागला माझ्याशी त्याच्या डोळ्यातून पाणीच आलं

गावाकडून आलो होतो फिरायला
माझे मीच शिकलो होतो उडायला

उडतांना आवाजाची ठणकच बसली
शुद्ध हवेची जरा उणीवच भासली

जावं आपल्या मित्रांना भेटावं
पण येथे जंगलच नाही दिसले
तोडूनी आमचे घर माणसाने स्वतःचेच घर बांधले

Subscribe to RSS - जा पाखरा उडून जा