जा पाखरा उडून जा

Submitted by विनोद इखणकर - श... on 22 December, 2020 - 10:55

शीर्षक- "जा पाखरा उडून जा"

भयभीत होऊन पाखरू पायाशी आलं
मी त्याला विचारलं तुला काय झालं

ते काही बोलेना अंगाला झालेल्या वेदना
त्याला काही सहन होईना

थोडावेळ शांत बसलं आणि मध्येच हसलं

बोलायला लागला माझ्याशी त्याच्या डोळ्यातून पाणीच आलं

गावाकडून आलो होतो फिरायला
माझे मीच शिकलो होतो उडायला

उडतांना आवाजाची ठणकच बसली
शुद्ध हवेची जरा उणीवच भासली

जावं आपल्या मित्रांना भेटावं
पण येथे जंगलच नाही दिसले
तोडूनी आमचे घर माणसाने स्वतःचेच घर बांधले

बसलो होतो त्यांच्या घरात विचार करत की त्यांनी आमचं भविष्य गमावलं
आणि तितक्यात एका माणसाने मला पायी तुडवलं

सांगितली त्या पाखरा ने त्याची कथा
मला समजली त्याची चिंता

माणसाला माणुसकीच कळाली नाही तर
हा निसर्ग कोठून कळणार
म्हणून मी त्याला म्हणालो....

"जा पाखरा उडून जा"
"जा पाखरा उडून जा"

विनोद इखणकर
(शब्दप्रेम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users