टीव्हीतलं पाकिस्तान आणि स्मॉल वंडर
Submitted by वावे on 18 October, 2020 - 15:25
माझ्या लहानपणी आमच्याकडे अर्थातच ब्लॅक ॲंड व्हाईट टीव्ही होता आणि छपरावर काड्यांचा ॲंटेना. ’दंगल’ चित्रपटात सुरुवातीला टीव्हीवरची मॅच नीट दिसावी म्हणून आमिर खान ऑफिसमधल्या एकाला वर ॲंटेना पकडून उभं रहायला लावतो. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हे केलेलं असल्यामुळे ते दृश्य आपल्याला चांगलंच ओळखीचं वाटतं. आमच्याकडे यात फरक एवढाच होता, की ॲंटेना पकडूनही टीव्हीवरचा कार्यक्रम नीट दिसायचा नाहीच.
मुंबईच्या दूरदर्शन केंद्रातून आमच्याकडे येणार्या लहरींना गावाभोवतालच्या डोंगरांचा अडथळा व्हायचा.
विषय:
शब्दखुणा: