देशात आहे कायदा आपल्या पण त्याची भीती कुणालाही नाही सरकार आहे देशात आपल्या पण त्यांची निती वेगळीच काही! देशात कीतीही कडक कानून कायदे असले तरी लोक एवढ्या खालच्या थराला का जातात? आता गरज आहे नव्या बदलांची

का असा वागतो समाज माझा?

Submitted by Santosh zond on 2 October, 2020 - 05:42

का असा वागतो समाज माझा?

का नकोशी वाटते त्यांना ती ?
का हवासा वाटतो त्यांना तो ?
मुलगी असल्यास वडील होतात दीर्घायुषी
का विज्ञान खोटं ठरवतो समाज माझा!

वंशाचा दिवा,वंशाचा दिवा
काहीसा एकेरी चालतो समाज माझा
जन्माला आलेल्या चिंगारीला मात्र
कचऱ्यात कोंबून मारतो समाज माझा!

मग का वंशाचा दिवा तुमचा
आश्रमाकडे प्रकाश दाखवतो
नकोशी असलेली ती मात्र तुम्हाला
जगण्याची नवी वाट दाखवते !

जगवलेला दिवा तुमचा
म्हातारपणी अंधार होतो
लहानशी चिंगारी मात्र
स्वतः जळून पहाट होते !

Subscribe to RSS - देशात आहे कायदा आपल्या  पण त्याची भीती कुणालाही नाही  सरकार आहे देशात आपल्या  पण त्यांची निती वेगळीच काही!   देशात कीतीही कडक कानून कायदे असले तरी लोक एवढ्या खालच्या थराला का जातात?  आता गरज आहे नव्या बदलांची