सर्व बहुजन समाजाला आदरस्थानी असणारे छ. शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून जेम्स लेन याने सर्व बहुजनांच्या भावना दुखावल्या आहेत. आजपर्यंत बहुजन मुलनिवासिंच्या महापुरुषांची अनेक वेळा बदनामी करण्यात आली. बहुजनांच्या प्रेरणास्थानांची बदनामी केली की त्यांच्या विचाराने कार्यरत असणार्या चळवळीन्चे खच्चीकरण होते. त्यामुळे कथा, कादंबर्या, चित्रपट, नाटके, मालिका याद्वारे बहुजन महापुरुषाना खलनायक ठरवून मांडणी करण्यात येते. वरील सर्व माध्यमावर समाजातील एका वर्गाची सत्ता असल्यामुळे त्यानी बहुजनांच्या आराध्य देवतांची बदनामी करण्यासाठी त्याचा उपयोग केला. जेम्स लेन ने जिजाऊबद्दल जो विकृत मजकुर लिहिला आहे, त्याला आधार (पुरावा) महाराष्ट्रातील लोक असे कुजबुजतात, असे लेन म्हणतो. आपल्या मातेसमान असणार्या जिजाऊबद्दल असली कुजबुज बहुजन समाज तर मुळीच करणार नाही. मग ही कुजबुज लेनच्या कानावर कुणी घातली, याचा शोध घेण्याची गरज आहे. लेन प्रकरणात दूसरा महत्वाचा मुद्दा असा की संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व काही पुरोगामी संघटना वगळता सर्वजण ( हिंदुत्ववादी पक्ष, संघटना, प्रसारमाध्यमे ) लेनच्या नावाने बोंब ठोकत आहेत. आणि लेनला मदत करणार्या स्वकीय शिवद्रोही लोकांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. समाजाने हे समजुन घेण्याची गरज आहे की जेम्स लेन वापरलेला आहे. लेनच्या खांद्यावर पुण्यातील काही विद्वांनाची बंदूक आहे . खांदा लेनचा आहे पण गोळ्या कुणावर चालवायच्या हे ते विद्वान ठरवत आहेत. त्यामुळे या विकृतिमागे कुणाचा ब्रेन आहे ते शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
संभाजी ब्रिगेड ने भांडारकरवर कारवाई केल्यानंतर चवताळून उठानार्या 'पुरोगामी ' व्यक्तिना शिवारायाच्या बदनामीचा राग येत नाही का ? त्यावेळी या भान्डारकरची बाजु घेणार्या विद्वानाना एक प्रश्न सातत्याने विचारला गेला की हल्ला निषेधार्ह असेल तर शिवारायाची बदनामी निषेधार्ह नाही का ? परन्तु याचे उत्तर संभाजी ब्रिगेड विरुद्ध कांगावा करणार्या एकाही विद्वानाने दिले नाही, यातच त्यांचा दुटप्पीपना दिसून येतो.
छ. शिवराय आणि आई जिजाऊ यांची बदनामी- एक षड्यंत्र
Submitted by प्रकाश पोळ on 24 September, 2010 - 13:19
गुलमोहर:
शेअर करा
प्रकाश, त्याचे कारण असे आहे
प्रकाश, त्याचे कारण असे आहे की ही चूक लेन ची आहे. बाकी कोणाचीही नाही. भांडारकर संस्थेत तो स्टेनोग्राफर म्हणून आलेला नव्हता त्याला सांगतील ते डिक्टेशन लिहायला. त्याने त्याच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या लोकांनी त्याला त्याच्या रिसर्च मधे मदत केली एवढाच त्याचा अर्थ होतो. त्याने जे चुकीचे लिहीलेले आहे ते त्याला सांगितले असा नाही. पण ब्रिगेड पासून इतर बर्याच संघटनांनी त्याचा विपर्यास केलेला आहे. पुस्तकात धन्यवाद दिले असतील तर त्यातील ओळ न ओळ मान्य आहे (किंवा मुळात वाचली आहे) असे होत नाही.
तू वरती लिहीलेले आहेस ते खरे आहे - कोणीही समंजस मराठी माणूस (कोणत्याही जातीचा) असे करणार नाही. लेन ने हे नक्की कोठे ऐकले हे आपल्याला कळणे शक्य नाही. ही अशी बदनामी निषेधार्ह आहेच आणि सर्वांनी त्याचा निषेध केलेला आहेच की. पण त्याचा एका जातीशी संबंध लावण्यात येतोय हे ही चुकीचे आहे.
शिवराय आणि जिजाउंच्या बाबतीत असलेला आदर सर्वांनाच आहे. त्यात जातीचा संबंध नाही.
त्यावेळी या भान्डारकरची बाजु
त्यावेळी या भान्डारकरची बाजु घेणार्या विद्वानाना एक प्रश्न सातत्याने विचारला गेला की हल्ला निषेधार्ह असेल तर शिवारायाची बदनामी निषेधार्ह नाही का ? >> प्रकाश, प्रश्न विचारायची जागा चुकली रे बाबा.
अरे काय हे उठ्सुठ ब्रिगेड,
अरे काय हे उठ्सुठ ब्रिगेड, लेन, मराठे-ब्राह्मण-दलित वगैरे थोतांड लावलंय?? मायबोली आहे का ब्रिगेड्चे मुखपत्र???? स्वतःची अक्कल गहाण ठेवून लोकांना का त्रास देताय?
अॅड्मिन,
माझ्यासारख्या वाचकाला रोज उठून माझ्या आदरस्थानांविषयी चिथावणी देणारे, जातीच्या मुद्द्यावरून अगदी खालच्या पातळीला जाणारे, आणि इतिहासाचा शुन्य अभ्यास असलेले असले लेख "बघूनसुद्धा" त्रास होतो. हे असले बकवास लेखन वाचायचे असते तर ब्रिगेड्चा पेपर (शिवधर्म ना?) वाचला असता.. तुम्ही काही कारवाई करू शकत नाही का? नाही तर काही आय्ड्यांच्या लेखांना इग्नोर सुविधा द्या.
(No subject)
अॅड्मिन, अजून एक..मधुकर आणि
अॅड्मिन,
अजून एक..मधुकर आणि प्रकाश पोळ हे ब्रिगेडचे अॅक्टीव कार्यकर्ते आहेत असे त्यांच्या विपू वरून दिसते.
मधुकर24 September, 2010 - 21:12
जय जीजाऊ,
अरे वा, कुठे राहता. आनंद झाला ईथे ब्रिगेडवाल्याना भेटुन.
शनिवार व रविवारला सातारा रोडच्या ब्रिगेडच्या हाफिसात असतो मी.
या तिकडे भेटू या.
आपल्या काही कार्यकर्त्यांची भेटघाटही घालून देईन.
जय शिवराय.
आपल्या राजकीय/सामाजिक आयडीऑलॉजीच्या प्रसारासाठी मायबोलीचा वापर केलेला चालतो का?
तसे असेल तर उद्यापासून रोज एक बिनबुडाचा लेख मी ही टाकायला सुरु करेन म्हणते...
ज्या जेम्स लेनच्या नावाने खडे
ज्या जेम्स लेनच्या नावाने खडे फोडताय तो लेख वा मूळ ग्रंथ कोणी वाचलाय तरी का? उगाच काय भांडत बसताय? आणि पुस्तकं जाळून कुठलेही विचार संपत नसतात. शिवराय आणि जिजाऊ हे अख्या महाराष्ट्राला आदरस्थानी आहेत. त्यांचा अपमान करण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवणार नाही. परंतु दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु. ते उच्चवर्णीय होते, त्यामुळे त्याना गुरु म्हणून नाकारावे असा विचार काही तथाकथित लोक करतात. किंबहुना बारावीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात केवळ वादंग नको म्हणून दादोजी कोंडदेवांवरचा उतारा गाळावा लागला असे ऐकीवात आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक दडपशाहीला लोक चक्क घाबरतात, ते विचार पटतोय म्हणून नव्हे, तर विध्वंसक वृत्ती आहे म्हणून!
याच विषयाशी निगडित विषय काही
याच विषयाशी निगडित विषय काही दिवस खुल्या चर्चेसाठी होता. त्यावर सगळ्यांना भरपूर लेखन स्वातंत्र्य मिळाले आहे. ही सूचना दिसावी म्हणून हा धागा अजून प्रकाशित ठेवला आहे.
याच विषयाशी निगडित इतर धागे कुठलीही अधिक सूचना न देता अप्रकाशित करण्यात येतील.