लतादेवीची आरती
जय देवी जय देवी जय लता देवी
शंभर वर्षे माझेही करियर करवी |
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
सारे श्रमले तरीही तू गात राही
काही विवाद करिता पडले प्रवाही
तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी...
सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी
किती गायिकांची भरली शंभरी
वीणा, नुपूर आणि आली बासुरी
तुझिया वाणीमध्ये परा वैखरी |२| जय देवी....
हृदयामध्ये उमले नित्य नवी उषा
मीनासंगे सागर रमवी जगदीशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
सारेगमपधनी पळवी निराशा |३| जय देवी...