आजच्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करण्याचा छोटासा प्रयत्न

शिक्षणाचा बाजार

Submitted by तुषार विष्णू खांबल on 12 June, 2020 - 15:51

शिक्षणाचा बाजार
शब्दांकन :- तुषार खांबल

शिक्षणाचा झालाय बाजार
पालक झालेत ग्राहक
चढाओढीच्या या जगामध्ये
विद्यार्थी मरतो नाहक

दप्तराचे ओझे वाहून
दुखू लागते लहानगी पाठ
शिक्षणाच्या दर्जा पेक्षा
फी मात्र वाढते भरमसाठ

शाळा, क्लास, खाजगी ट्युशन
साऱ्यांचीच होतेय सरमिसळ
डोनेशनमध्ये जरी ओतला पैसा
तरी शिक्षणात मात्र भेसळ

विद्यार्थ्यांचे हित जपणारा
तो शिक्षकवर्ग कुठे गेला
आजघडीचे शिक्षण म्हणजे
लबाड कोल्ह्यांचा भरलाय मेळा

Subscribe to RSS - आजच्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करण्याचा छोटासा प्रयत्न