Submitted by तुषार विष्णू खांबल on 12 June, 2020 - 15:51
शिक्षणाचा बाजार
शब्दांकन :- तुषार खांबल
शिक्षणाचा झालाय बाजार
पालक झालेत ग्राहक
चढाओढीच्या या जगामध्ये
विद्यार्थी मरतो नाहक
दप्तराचे ओझे वाहून
दुखू लागते लहानगी पाठ
शिक्षणाच्या दर्जा पेक्षा
फी मात्र वाढते भरमसाठ
शाळा, क्लास, खाजगी ट्युशन
साऱ्यांचीच होतेय सरमिसळ
डोनेशनमध्ये जरी ओतला पैसा
तरी शिक्षणात मात्र भेसळ
विद्यार्थ्यांचे हित जपणारा
तो शिक्षकवर्ग कुठे गेला
आजघडीचे शिक्षण म्हणजे
लबाड कोल्ह्यांचा भरलाय मेळा
एकच विनंती करतो तुम्हा
ज्ञानदीप हा मालवू नका
मनामधील गुरूंचा आदर
अश्या कृतीने घालवू नका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
सुंदर कविता
सुंदर कविता
धन्यवाद तेजो आणि रुपाली
धन्यवाद तेजो आणि रुपाली
सत्यपरिस्थिती!
सत्यपरिस्थिती!
पण आजही तळमळीने शिकवणारे शिक्षक आहेत.. त्यांच्या सकारत्मकतेचा अंशतः उल्लेख कवितेत असायला हवा होता. असे वाटले..
धन्यवाद मन्या.... त्यांच्या
धन्यवाद मन्या.... त्यांच्या बद्दल लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन