#कविता#निसर्गचक्रीवादळ

चक्रीवादळ...

Submitted by aksharivalay 02 on 10 June, 2020 - 17:14

काय झाकावं? काय जपावं?
कशावर होईल नेमका प्रहार
डोळे भरून पाहून घेतलं त्याने
पुन्हा पुन्हा घरदार

समोर उभ्या अकस्मात संकटापूर्वीची
जीवघेणी शांतता
घट्ट राहा पाय रोवून इतकंच सांगणं घराला
गाव सोडून जाता जाता

पिसाळलेल्या जनावरासारखं
सुटलंय ते बेफाट
अल्पजीवी असलं तरी घरादाराला
मातीमोल करेल त्याची एखादी लाट

बायकापोरांशिवाय जास्त काही
बरोबर घेता येणार नाही
उभा असेन मी असाच इथे
अंगणातल्या झाडाने भरली ग्वाही

Subscribe to RSS - #कविता#निसर्गचक्रीवादळ