बालकथा: रामूची हुशारी
Submitted by पाषाणभेद on 10 June, 2020 - 01:37
बालकथा: रामूची हुशारी
एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता.
शब्दखुणा: