नवीन गझल

भांडू मी कुणाशी

Submitted by सचिन–चव्हाण on 5 June, 2020 - 10:59


काय भांडू मी कुणाशी
पोट असतांना उपाशी

शेवटी मी मोडली ती
वाट रुळलेली जराशी

कोवळे का दुःख माझे ?
घाव जपतो मी उराशी

माय माझी राहते ते
स्थान बनते एक काशी

दुःख विकण्या काढले मी
भाव झाला ना हराशी

सत्य होते ते कदाचित
भूक म्हणते हो अधाशी

मातृभूमी रडत असते
लेक जेव्हा जाय फाशी

आसवांची पैज होती
जिंकलो मी श्रावणाशी

Subscribe to RSS - नवीन गझल