छोट्या छोट्या गोष्टी

इटुकल्या पिटुकल्या गोष्टी

Submitted by मोहना on 31 March, 2020 - 21:55

आजोबा
'चष्मा आण, पाणी दे. चहा कर.' आजोबा दिसेल त्याला पकडतात. कामांची रेल्वेगाडी सोडतात. आई म्हणते, ’नाचवतात सगळ्यांना.’
मी त्यांना काम सांगितलं की मात्र ओरडतात,
'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत डुलत बसतात.
मी आज खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली. आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का जमदग्नी?"
"कोण जमदग्नी? बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो. आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.

Subscribe to RSS - छोट्या छोट्या गोष्टी