आठवणीतील 'शाळा' :-4
Submitted by Cuty on 19 February, 2020 - 05:55
त्याकाळी लहान गावात, वाड्यावस्त्यांमध्ये अंगणवाड्या नसत. मग तेथील गरीब लोक मुलांना पाच वर्षांपर्यंत शाळेतच पाठवत नसायचे. कधी कुणी शिकलेले पालक घरीच मुलांना थोडेफार शिकवायचे. तर इतर कमी शिकलेले, कष्टकरी लोक मुलांच्या शिक्षणाचा अजिबात विचारच करायचे नाहीत. मात्र मूल पाच वर्षाचे झाले की, मग मात्र ही सर्व मुले जवळच्या गावी थेट पहिलीत जात असत. त्याकाळी एकच एसटी शाळेच्या वेळेनुसार एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी आसपासच्या खेडेगावांमध्ये जाई. त्यातूनच ही पहिली ते चौथीची सर्व मुले एकटी, गावातील इतर लोकांबरोबर शाळेच्या गावात येत जात असत. त्यांचे पालक कधीच शाळेत ने-आण करण्यासाठी येत नसत.
शब्दखुणा: