अक्षर

कोंबडीचे पाय

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 February, 2020 - 02:00

साधारण चारपाच वर्षांपूर्वीचा किस्सा. मित्रासोबत एका बॅंकेत गेलो होतो. मित्राचेच काम होते. मला त्यातले कळते, असे त्याला उगाचच वाटत असल्याने मला सोबत म्हणून नेले होते. पण माझे आपले अवांतर निरीक्षण चालू होते. सहज नजर एका मुलीवर पडली. अडकली. ओळखीची वाटली. नजरानजर होताच तिच्याही चेहरयावर ओळखीचे भाव आले. पण नेमके कुठली ओळख ते आठवेनासे झाले. अश्यात अनोळखी मुलीकडे बघून हसायचे तरी कसे. कसेबसे चेहरयावर आलेले ओळखीचे भाव आवरले आणि वोह कौन थी? हे आठवू लागलो.

विषय: 
Subscribe to RSS - अक्षर