अंधार फार आहे...........

Submitted by सांजसंध्या on 4 September, 2010 - 09:57

अंधार फार आहे...........
( कविता )

तांडा दिसेल का हो, अंधार फार आहे
मज खूण ही मिळेना, अज्ञान ठार आहे

येऊ कशी कळेना, ही घालमेल चाले
तळपायी रूतलेल्या, काट्यास धार आहे..

नाही असा करावा, भक्तास हा दुरावा
नाही मला बुलावा, त्याचीच हार आहे..

हा मार्ग एकटीचा, साथीस कोणी नाही
डोळ्यांस आठवांचे, आसू उधार आहे..

हे दान जीवनाचे, हासून झेललेले
बोलावलेस अंती , तांडा तयार आहे..

संध्या
०४ सप्टेंबर २०१०१
(पहाटे ३:१()

गुलमोहर: 

कविता सुंदर आहे पण ...........
तांडा दिसेल का हो, अंधार फार आहे
मज खूण ही मिळेना, अज्ञान ठार आहे

याचा अर्थ नाही कळला....

नाही असा करावा, भक्तास हा दुरावा
नाही मला बुलावा, त्याचीच हार आहे.. >>>>> सुरेखच, आवडली Happy