वणवा

निखारे

Submitted by तो मी नव्हेच on 28 July, 2020 - 01:45

न जाणें कशी सामसूम झाली चोहीकडे आज शांत आहे
जरी पेटले ना चुलीचे निखारे जठरी ना त्यांची भ्रांत आहे

तो तसा न ऐकू जाई कुणाला, ते तसे ना कोणास दिसते
डोळ्यांत स्वप्ने जळतात आणि पोटांमध्ये आक्रांत आहे

खाजगीत रडणे असते कुठे अन् कुठे असे जाहिरातबाजी
निःशब्द रडणे रंध्रात येथे धमन्यात लाव्हा अशांत आहे

शाब्दिक पाऊस, फुसके फटाके पक्वान्न केवळ आश्वासनांचे
येथे ना येई दसरा दिवाळी पाचवीस पुजली संक्रांत आहे

छातीतला श्वास भात्याप्रमाणे फुलवीत जाई ह्रदयी निखारे
तरीही निखारे वणवे न होती डोळ्यांत पाणी प्रशांत आहे

-रोहन

वणवा

Submitted by @गजानन बाठे on 30 September, 2019 - 11:31

वणवा

फुलली जी बाग होती,
सगळी लयास गेली,
माझ्याच भावनांना,
ज्यांचीच आस होती.
वारा सुसाट होता,
पाने गळीत होती,
मन काय थोर होते,
नाती जळीत होती.
दाहि दिशांस वणवा,
गुरे पळीत होती,
तृण शूद्र काय होते,
शरीरं मलिन होती.
माझीच माणसे तव,
काया पोळीत होती,
लोकांस काय त्याचे,
वाह!वाह! करीत होती..

गजानन बाठे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वणवा