प्रयत्नांती

प्रयत्नांती चंदग्रहण

Submitted by _तृप्ती_ on 29 August, 2019 - 02:13

आमच्या घरी सकाळी इतकी गडबड, धावाधावी असते की भारताचे पंतप्रधान जरी आले ना तरी त्यांना सुद्धा चहा मिळण्यासाठी थांबावं लागेल. माझी शाळा, चिंत्याची शाळा, बाबांची कामाला जायची गडबड. यात आजी ठरलेल्या वेळेस आप्पाना देवपूजेला बसवणार म्हणजे बसवणारच. खरं म्हणजे आप्पाना काही घाई नसते पण ते तरी आजीपुढे काय करतील. एकदा ते म्हणाले, " अगं देव काही पळून नाही जात. त्यांना सावकाश आंघोळ घालू." तर आजीने हे काही मोठे डोळे केले की आप्पा म्हणाले, "अगं असं मला स्वप्न पडलं ग. मी बसतोच आहे पूजेला. तुझी पूजेची तयारी झाली ना?" मग आजी तोऱ्यात विजयी मुद्रेने आत निघून गेली.

Subscribe to RSS - प्रयत्नांती