भ्रमाचा भोपळा
भ्रमाचा भोपळा
माया मोह नाती-गोती
रचिला कुणी सापळा?
जगणे आपुले या जगती
असे भ्रमाचा भोपळा
येतो कुठून? जातो कुठे?
अंधारल्या सगळ्या वाटा
स्वार्थ आपला तरी सुटेना
जगण्याचा व्यर्थ आटापिटा
हसत जगा हसवीत जगा
जगण्याचा ना अर्थ वेगळा
व्यर्थ लागता स्वार्था पाठी
मग फुटे भ्रमाचा भोपळा
जन्म-मरण नाही हाती
ब्रह्मांडातला कण क्षुल्लक
सर्वस्व सोडून सरणावरी
अंती होशी तू कफल्लक